पालघर : वाडा येथे एसटीला भीषण अपघात झाला असून त्यात ५२ प्रवासी जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.हा अपघात वाडा-अघई महामार्गावरील जांभुळपाडा येथे मंगळवारी (१३ ऑगस्ट) सकाळी सातच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस शेतात गेली. जखमींमध्ये बहुसंख्य विद्यार्थी आहेत. एसटी प्रशासनाने एक हजार रूपयांची तातडीची मदत दिली.

अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ५२ प्रवासी होते. जखमींपैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील सामान्य रूग्णालयात हलविले. तर उर्वरित प्रवाशांवर वाडा येथील ग्रामीण व खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा