अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात भीमा व गोदावरीला नदीला आलेल्या पुरामुळे 58 कोटी 85 लाखाचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून सरकारकडे अहवाल पाठवला असून नुकसान भरपाईपोटी 58 कोटी 85 लाखाची मागणी केली आहे.

गेल्या आठवड्यात भीमा, गोदावरीला आलेल्या पुरामुळे कोपरगाव, राहाता ,श्रीरामपूर, नेवासा, श्रीगोंदा, कर्जत या सहा तालुक्यातील चौसष्ट गावांना फटका बसला .जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल घेत 35 पथकांद्वारे 3540 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले तर या पुरामुळे 523 घरांची व झोपड्यांची पडझड झाली. 27 हजार हेक्‍टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले असून एका व्यक्तीचा मृत्यु झाला आहे तर पाच जनावरे दगावली आहेत.

- Advertisement -

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा