दिल्ली : काश्मिरींना स्वत:च्याच घरात कैद केल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी सोमवारी केला. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम काढल्यामुळे आता असा विशेष दर्जा मिळालेल्या अन्य राज्यांवरही त्याचा परिणाम जाणवू लागेल, अशा इशाराही त्यांनी दिला.

श्रीनगरमध्ये प्रवेश करण्यापासून येचुरी यांना शुक्रवारी रोखले होते.त्यांनी सोमवारी ट्विटरवरून बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.”आनंद आणि उत्सवाचा सण असणाऱ्या ईदच्या दिवशी स्वत:च्याच घरात कैद असलेल्या काश्मिरींसोबत आम्ही आहोत.आमचे कॉम्रेड्स आता कुठे आणि कोणत्या परिस्थितीत आहेत,हेच अजून आम्हाला माहीत नाही’,असे ट्विट त्यांनी केले.

‘आपला देश हा विविध भाषा, धर्म, संस्कृती आणि विविध विचारांनी संपन्न आहे. हीच आपली ताकद आहे. लोकशाहीला झुगारून आणि बळजबरीने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढला.आता याचा परिणाम असा विशेष दर्जा असणाऱ्या अन्य राज्यांवरही जाणवेल. यातील बहुतेक राज्ये ही भारताच्या सीमेवर आहेत, हे विसरता कामा नये,’ असे येचुरी यांनी म्हटले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा