इस्रोच्या बंगळुरु केंद्रात बसून ‘चांद्रयान २’ चंद्रावर उतरताना पाहण्याची संधी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मात्र यासाठी केंद्र सरकारने आयोजित केलेली प्रश्नमंजुषा स्पर्धा विद्यार्थ्यांनी जिंकणे आवश्यक आहे.

अवकाश संशोधनाबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन सरकारने केले आहे. दहा मिनिटांत २० प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी देणे अपेक्षित आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देणारे विद्यार्थी विजेते ठरतील.

या विद्यार्थ्यांना ७ सप्टेंबरला इस्रोच्या केंद्रात हजर राहून ‘चांद्रयान २’ चंद्रावर उतरतानाचा अनुभव प्रत्यक्ष घेता येणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा उपस्थित असणार आहेत.

एका विद्यार्थ्यांला एकदाच स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धा सुरु झाल्यानंतर मध्येच थांबवता येणार नाही. पालक विद्यार्थ्यांना प्रश्नाचा अनुवादास मदत करू शकतात, मात्र उत्तरे लिहिण्यास मदत करु शकत नाहीत. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे.

सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांचे नाव, पत्ता असलेले सरकारी ओळखपत्र आणि स्पर्धक हा शाळेचा विद्यार्थी असल्याचे संबंधित शाळेचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार,असे इस्रोने म्हटले आहे.

या संकेतस्थळावर विद्यार्थी नोंद करू शकतात

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा