पुणे : गेले 8 दिवस संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढणार्‍या पावसाने सोमवारी बर्‍यापैकी विश्रांती घेतली होती़. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला़. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी हलका पाऊस झाला़. दरम्यान, मंगळवारी व बुधवारी कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.

कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात 13 व 14 ऑगस्टला तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा