शेकडो हेक्टर जमिन निवासी करण्यासाठी षडयंत्र

पुणे: पुण्यातील मुठा नदीची पुररेषा डिजीटलायजेशनच्या नावाखाली पाटबंधारे विभागाने बदलली आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांना फायदा होण्यासाठी पुणेकरांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार जलसंपदा विभागाने केला आहे. बांधकाम विभागाने सुध्दा आता बदललेल्या पुररेषेप्रमाणे बांधकाम परवानग्या देण्यास सुरुवात केली असल्याचा आरोम स्वयंसेवी संस्थांकडुन करण्यात आला आहे.

जलसंपदा विभाग जाणीवपुर्वक माहिती लपवत असल्याचा आरोप वास्तुविशारद सारंग यादवाडकर, माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर आणि असिम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

यादवाडकर म्हणाले, पुण्यात चाळीस हजार क्युसेक वेगाने पाणी सोडल्यानंतर शहराच्या काही भागात पाणी शिरले. मुळात पुररेशा 60 हजार क्युसेकची आहे. त्यामुळे नदीपात्रामध्ये झालेले बेसुमार अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे यामुळे हा प्रकार झालेला आहे. आता तर जलसंपदा विभागाने पुररेषाच बदलण्याचा घाट घातला आहे. 2009 साली शासनाने अंतिम केलेली पुररेशा डिजीटलायजेशनच्या नावाखाली बदलण्यात आली आहे.

सविस्तर बातमी उद्याच्या दैनिक केसरीमध्ये

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा