उल्हासनगर: कॅम्प तीनमधील ‘महक अपार्टमेंट’ ही पाच मजली इमारत आज सकाळी दहाच्या दरम्यान कोसळली. या इमारतीला सोमवारी बऱ्याच ठिकाणी तडे गेले होते. त्यामुळे महापालिकेने ही इमारत रिकामी केली होती. जवळपास १०० जणांना स्थलांतरित केले होते.इमारत वेळीच रिकामी केल्याने मोठा अनर्थ टळला.

इमारतीला सोमवारी बऱ्याच ठिकाणी तडे गेल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. महापालिकेचे अधिकारीही घटनास्थळी आले होते. त्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारतीमधील ३१ फ्लॅटमधील जवळपास १०० जणांना स्थलांतरित करून ती सील केली. ही इमारत आज सकाळी दहा वाजून आठ मिनिटांनी कोसळली.वेळीच इमारत रिकामी केल्याने तब्बल १०० जणांचे प्राण वाचले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा