डेंग्यू, दमा, कर्करोगावर गुणकारी फळ

पुणे : बदलत्या वातावरणामुळे शहरात साथीचे आजार वाढले आहेत. डॉक्टरही काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. पेशी वाढवणे, डेंग्यू, दमा, कर्करोग आदी आजारावर गुणकारी फळ म्हणून ड्रॅगची फळाची ओळख आहे. त्यामुळेच पुणेकर या फळाला खरेदीसाठी पसंती देत आहेत. या फळाचा हंगाम सुरु होऊन दोन आठवडे झाले आहेत. फळ बाजारात या फळाची रोज 8 ते 10 टनाची आवक होत असल्याची माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली.

सुपेकर म्हणाले, सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, पुणेू जिल्ह्यातून बारामती, नगर जिल्ह्यातील विविध भागातून या फळाची आवक होत आहे. तर, गुजरात येथूनही काही प्रमाणात आवक होते. पांढर्‍या रंगाच्या ड्रॅगनला प्रतीकिलोस 30 ते 100 रुपये भाव मिळत आहे. तर लाल रंगाच्या ड्रॅगनला 50 ते 150 रुपये प्रतिकिलोस भाव मिळत आहे़ लाल आणि पांढरे अशा दोन प्रकारची ड्रॅगन फळे आहेत. त्यातील लाल रंगाच्या ड्रॅगनला ग्राहकांकडून जास्त मागणी आहे.

ड्रॅगन उत्पादक शेतकर्‍यांकडून शासनाने प्रक्रिया उद्योग सुरु करावेत अशी मागणी होत आहे. ड्रॅगन फळाला सध्या काही प्रमाणात ज्युस विक्रेते आणि आईस्क्रिम विक्रेत्यांकडून मागणी होत आहे. शेतकर्‍यांनी राज्यात विविध ठिकाणी मेळावे घेवून या फळावर प्रक्रिया करुन काय करता येईल यावर विचार मंथनही केले आहे.

व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, ड्रॅगनला मुंबईसह राज्याच्या विविध भागातून आणि गोवा, गुजरात येथून जास्त मागणी आहे. मागील तीन-चार वर्षात शेतकर्‍यांचा हे पिक घेण्याकडे कल वाढला आहे. शेतकर्‍यांना त्याचा फायदा होत आहे. या फळाचे उगमस्थान अमेरिका आहे. अमेरिका, थायलंड, मलेशिया,

व्हिएतनाम, श्रीलंका, बांग्लादेश या ठिकाणी यशस्वीरित्या व्यापारी पीक म्हणून याचे पिक घेतले जाते. आता खास उष्णप्रदेशीय देशामध्ये याचे उत्पादन घेतले जाते. ड्रॅगन फळाची चव साधारण किवी फळासारखी असते. आंबट, खारट आणि थोडीशी गोड असते. या फळामध्ये काळसर रंगाच्या बिया असतात. त्या चविष्ट असतात.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा