वॉशिंग्टन : अमेरिकेतले नेते टॉम सुओजी यांनी कलम ३७० प्रकरणी केलेल्या वक्तव्यावरुन भारतीयांची माफी मागितली.अमेरिकी काँग्रेसचे नेते टॉम सुओजी यांनी मागील आठवड्यात जम्मू काश्मीरसंदर्भात एक भारतविरोधी वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिकेतला भारतीय समुदाय नाराज झाला. याच सगळ्या वाद मिटविण्यासाठी त्यांनी माफी मागितली.

काश्मीर प्रकरणी अमेरिकेतल्या भारतीय समुदायाची मी जाहीर माफी मागतो आहे असे टॉम सुओजी यांनी म्हटले. मी माइक पॉम्पिओ यांना गेल्या आठवड्यात एक सविस्तर पत्र लिहून ट्रंप प्रशासनाने प्रसंगी काश्मीर प्रश्नी लक्ष घालावे अशी मागणी केली होती.

भारताने उचलेले पाऊल काश्मीरसाठी धोकादायक आहे. यामुळे बऱ्याच प्रकारची संकटे निर्माण झाली असाही उल्लेख टॉम सुओजी यांनी त्यांच्या पत्रात केला होता. मात्र आता या सगळ्याबाबत त्यांनी अमेरिकेतल्या भारतीयांची माफी मागितली आहे.माइक पॉम्पिओ यांना पत्र लिहिण्याआधी मी अमेरिकेतल्या काही भारतीय मित्रांशी सल्लामसलत करायला हवी होती असे ही टॉम यांनी म्हटले.

टॉम यांनी माईक पॉम्पिओना जे पत्र लिहिले त्यात असेही म्हटले होते की, नरेंद्र मोदी सरकारने जो निर्णय घेतला आहे त्यामुळे काश्मिरात तणाव निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. दहशतवाद संपवण्यासाठी त्यांना प्रयत्न करायचे आहेत हेच त्यातून दिसते असाही उल्लेख पत्रात केला होता.

मात्र टॉम सुओजी यांनी जे पत्र लिहिले त्यामुळे भारतीय समुदायात चांगलीच नाराजी पसरली होती. कारण टॉम हे निवडणुकीला उभे होते तेव्हा त्यांचा प्रचार अमेरिकेतल्या भारतीयांनीच केला होता.आता त्यांनी भारतविरोधी भूमिका घेतल्याने अमेरिकतले भारतीय त्यांच्यावर नाराज झाले. मात्र गेल्या आठवड्यात आपण जे पत्र पाठवले त्याबाबत आपण दिलगीर आहोत असे टॉम सुओजी यांनी म्हटले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा