नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्या प्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. काश्मीर प्रकरणी निर्णयानंतर प्रियांका गांधींनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली. काश्मीरमधून कलम ३७० हटवणे असंवैधानिक असल्याचे प्रियंका गांधींनी म्हटले.तत्पूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले होते की,सरकारने जो निर्णय घेतला आहे ते संविधानाचे उल्लंघन आहे. या प्रकरणाने राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी प्रियंका गांधींनी ट्विट करत ईद-उल-अजहाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

प्रियंका गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ईद मुबारक!, काश्मीरमधल्या माझ्या बहीण-भावांना भयानक त्रास सहन करावा लागतोय. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात पूरस्थितीचा सामना करणाऱ्या कुटुंबीयांनाही कदाचित ईदचा सण साजरा करता आलेला नाही. केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने कलम ३७० मध्ये बदल केला. त्या संवैधानिक बदलामुळे जम्मू-काश्मीरला मिळणारा विशेष दर्जा संपुष्टात आला आहे. केंद्राने विधेयक आणून जम्मू-काश्मीर आणि लडाख दोन वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा