मुंबई: महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरसह कोकण, नाशिक व अन्य जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांसाठी राज्य सरकारने आज सहा हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली. घरे, शाळा, रस्ते, जनावरे आणि पिकांसह सर्व प्रकारच्या नुकसान भरपाई यातून केली जाईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राज्यात २००५ च्या तुलनेत यंदा तिप्पट पाऊस झाला. १ ते १० ऑगस्ट दरम्यान राज्यात अतिवृष्टी झाली.

राज्य सरकारने केंद्र सरकारला याबाबतची कल्पना दिली आहे. पुरामुळे झालेल्या एकंदर नुकसानीचा अंदाज घेऊन केंद्राकडे ६८०० कोटी रुपयांच्या मदत निधीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यापैकी ४,७०० कोटी रुपये कोल्हापूर, सांगली व साताऱ्यासाठी तर, उर्वरीत २१०५ कोकण, नाशिक व इतर जिल्ह्यांना दिले जातील,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून ही मदत मिळेल,असा विश्वास आम्हाला आहे. मात्र, त्यासाठी वेळ लागणार आहे. तोपर्यंत राज्याच्या आपत्ती निवारण निधीतून भरपाई दिली जाईल. पडझड झालेली घरे पूर्ण बांधून देण्यात येतील, तसेच मुख्यमंत्र्यांचा मासिक पगार देखील या कार्यासाठी देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा