पुणे: गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक (डीएसके (दीपक सखाराम कुलकर्णी) यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांना मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. अमेरिकेत पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अडीच हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची किमान २३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप कुलकर्णी बंधूंवर आहे. ‘डीएसके’ कंपनीत मकरंद कुलकर्णी हे ‘प्रमोटर’ पदावर आहेत. फसवणुकीच्या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. मकरंद यांचा अनेक दिवसांपासून शोध सुरु होता तसेच त्यांच्या विरोधात ‘लुकआऊट नोटीस’ काढण्यात आली होती. पहाटेच्या सुमारास अमेरिकेला पळून जात असताना त्यांना ताब्यात आले.

- Advertisement -

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा