नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील लावलेल्या बंदीवरुन मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी झाली. यावर सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरमधील परिस्थितीवर हस्तक्षेप करण्यास नकार दिला. या सुनावणी दरम्यान काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होण्यासाठी आणखी कालावधी लागेल. सरकारला त्यासाठी वेळ द्यायला हवा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देत या प्रश्नावर हस्तक्षेपास नकार दिला.

जम्मू काश्मीरमधील बंदी आणि कर्फ्यू हटविण्याची मागणी करणारी जनहित अर्जा सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सरकारी महाधिवक्त्यांना जम्मू काश्मीरमध्ये आणखी किती काळ बंदी परिस्थिती कायम राहील असा प्रश्न केला. त्यावर ऍटर्नी जनरल यांनी सांगितले की,सरकार काश्मीरमधील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा