पुणे : शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षण भरतीची सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील शिक्षकांना थेट नियुक्ती देण्यात आली असून, त्यातील उर्वरित रिक्त जागांवर पात्र उमेदवारांना सामावून घेण्यासाठी गरज भासल्यास शासनाच्या निर्णयात बदल करण्यात येईल. शिक्षक भरतीचा पुढील टप्पा 16 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिले.

शेलार म्हणाले, शिक्षक भरती हे निवडणुकीपूर्वीचे आश्वासन नसून आम्ही हे करूनच दाखवू. तीस वर्षांनंतर देशात नवीन सर्वंकष शैक्षणिक धोरण तयार होत आहे. दररोज विद्यार्थ्यांमध्ये वावरणार्‍या अनुभवी शिक्षकांनी, प्राध्यापकांनी त्यावर आपल्या हरकती सूचना जरूर पाठवाव्यात. व्यापक मंथनातून तयार होणार्‍या या धोरणातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे. डॉ. एकबोटे यांनी दीर्घकाळ रखडलेली शिक्षकेतर भरतीही सुरू करण्याची तसेच वेतनेतर अनुदानही सुरू करण्याची मागणी केली. डॉ. शामकांत देशमुख यांनी आभार मानले.

प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या रौप्यमहोत्सवपूर्ती कार्यक्रमाला आशिष शेलार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. महापौर सौ. मुक्ता शैलेश टिळक, संस्थेचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. ज्योस्त्ना एकबोटे, सुरेश तोडकर, उपकार्यवाह प्रकाश दीक्षित, निवेदिता एकबोटे आणि राजन देवकाते उपस्थित होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा