पुणे : धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या दमदार पावसामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली. तब्बल ४५ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात?आले. गुरुवारी रात्रीपासून पावसाने विसावा घेतल्यामुळे धरणातून कमी पाणी सोडण्यात येत?आहे. त्यामुळे आता नदीला आलेल्या पुराच्या खुणा सर्व नदीपात्रात पहायला मिळत आहेत. प्लॅस्टिक, चिंध्या, उन्मळून पडलेली झाडे असे चित्र नदीपात्रात पाहायला मिळाले.

शहर व परिसरात आणि धरण पाणलोट क्षेत्रात आठवडाभर दमदार पाऊस पडल्याने आणि धरणे भरल्याने मागील आठवडाभर शहरातून वाहणार्‍या मुळा आणि मुठा नदींना पाणी सोडण्यात आले होते. या पाण्यामुळे शहरातील काही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले, तर काही सोसायट्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे पालिकेच्या शाळांमध्ये आणि समाज मंदिरांमध्ये स्थलांतर करण्यात आले होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा