पुणे : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाल्याने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मदतीचा ओघ अनेक ठिकाणांहून सुरू झाला आहे. उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांनी देखील पूरग्रस्तांना मदत दिली आहे. माण तालुक्यात तहसीलदार पदावर कार्यरत असताना जलसंधारणाचे काम उल्लेखनीयरित्या केल्याने उपजिल्हाधिकारी माने यांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले आहे.

माने यांनी पुरस्काराची सर्व रक्कम पूरग्रस्तांसाठी देऊन संवेदनशीलतेचा प्रत्यय दिला. मदतीचा धनादेश माने यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे शुक्रवारी सुपूर्द केला. अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे या वेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राम यांनी सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तातडीने कक्ष स्थापन करून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठ महसूल अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.

तसेच पुण्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन विविध विषयांबाबत जिल्हास्तरावर समन्वय अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करून कामाला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल अधिकार्‍यांच्या बैठकीत पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचे वेतन देण्याचे महसूल अधिकार्‍यांनी जाहीर केले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, भूसंपादन उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्राकार यांच्यासह इतर अधिकारी, तहसीलदार या वेळी उपस्थित होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा