सातारा : महागाव येथील स्वाईन फ्लू झालेल्या एका महिलेचा पुणे येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याबाबत चिंचणेर वंदन प्राथमिक आरोग्य केंद्राने माहिती दिली. शशिकला रघुनाथ कदम (वय:४४,रा. महागाव, ता. सातारा) यांना चार दिवसापूर्वी सर्दी, ताप, खोकला येत होता. त्यांनी गावातीलच एका खासगी डॉक्टरकडे तपासणी करून औषधे घेतली.
मात्र काहीच फरक न पडल्याने त्यांनी संगमनगर (सातारा) येथील एका डॉक्टरला दाखवले.संबंधित डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता शशिकला कदम यांना स्वाईन फ्लूची लक्षणे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी तत्काळ चांगल्या रुग्णालयात तपासणी करून औषध उपचार घेण्याचे सुचविले. त्यानुसार कदम कुटुंबीयांनी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये शशिकला कदम यांना गुरुवारी दुपारी बारा वाजता दाखल केले.

मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शशिकला कदम यांचा स्वाइन फ्लूनेच मृत्यू झाल्याचे चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कारखानीस यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा